आरोग्य

पिंपरी-पाईट जिल्हा परिषद गटातील २०० कोरोना योद्ध्यांना बीसीजी लसीकरण

 

१२ हजार जेष्ठ नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती गोळ्या वाटप

महाबुलेटीन न्यूज : दत्ता घुले
शिंदे वासुली, ( दि.२७ ) : पिंपरी पाईट जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी नुकतेच जिल्हा परिषद निधीतून करंजविहीरे व पाईट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सारे १२ हजार ज्येष्ठ नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती गोळ्या, प्राथमिक व उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सीमिटर व सुमारे २०० कोरोना योद्ध्यांना रोगप्रतिकारक बीसीजी लसीचे लसीकरण करण्यात आले.

पुणे जिल्हा परिषदेने कोरोना संकटकाळात सर्व सदस्यांना नागरिकांच्या आरोग्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. अनेक सदस्यांनी सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज अशा अनेक साहित्यांचे वाटप केले. परंतु आरोग्यविषयक वैयक्तिक संरक्षक साधनांपेक्षा कोरोनाचा कहर पाहता नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती गोळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती बुट्टे पाटलांनी दिली. रोगप्रतिकारक गोळ्यांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी३ पावडर, व्हिटॅमिन सी, झिंक व आयर्न फॉलिक या चार आवश्यक गोळ्यांचा समावेश होता. या गोळ्यांच्या पाकिटांचे मतदारसंघातील गावनिहाय नियोजन करून आशा वर्कर ताईंनी सुमारे १२ हजार नागरिकांना गावोगावी जाऊन प्रत्यक्ष वाटप केले.

खेड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढतोच आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी सक्षम संसाधने उपलब्ध नाहीत. असणाऱ्या उपाययोजनात्मक साधने अपुरी व तोकडी पडतात. सध्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हा शासकीय उपक्रम गावोगावी खेडोपाडी राबविला जात आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, आशावर्कर ताई, ग्रामसेवक, पोलीस पाटील, शिक्षक व स्वयंसेवकांच्या माध्यमातून गावांमध्ये सर्व्हे केला जात आहे. अशा परिस्थितीत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सीमिटर चे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना करंजविहीरे व पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य कर्मचारी, पोलीस पाटील, सरपंच, पत्रकार, आशाताई व सामाजिक कार्यकर्ते अशा सुमारे २०० करोना योद्ध्यांना मोफत रोगप्रतिकारक लस देण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री महाजन, डॉ. गिरीश उभे, डॉ. स्वाती कराळे, करंजविहीरेच्या सरपंच उज्वला खेंगले, पाईटच्या सरपंच मंगल भांगे, भाऊ देशमुख, आंबेठाण सोसायटी संचालक रुपेश बुट्टे पाटील, नवनाथ डांगले, आरोग्य कर्मचारी व सर्व आशाताई वर्कर उपस्थित होते.
————————————

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.