पिंपरी चिचंवड

पिंपरी चिंचवड मधील मिळकतधारकांनी महापालिकेच्या योजनेचा लाभ घ्यावा : रमेश वस्ते

महाबुलेटीन न्यूज / सोमनाथ नढे
पिंपरी-चिंचवड : महापालिका करआकारणी व करसंकलन विभागामार्फत मिळकत धारकांसाठी दरवर्षी प्रमाणे ३० जुन पुर्वी थकबाकी सह दोन्ही सहामाहीची मिळकत कर बिलाची रक्कम आगाऊ भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना त्याचप्रमाणे *माजी सैनिक, महीला मिळकत धारक, ४०% पेक्षा जास्त अपंगत्व तसेच निसमर्थ मिळकतधारकांच्या मिळकतींना सामान्य कराचे चालु मागणीत ५% ते ५०% पर्यन्त सवलत देण्यात येते*. सध्या कोवीड 19 चा प्रादूर्भाव विचारात घेत सर्व मिळकतधारकांना सामान्य करातील सवलत योजनेचा लाभ घेता आला नाही, अशा मिळकतधारकांना सामान्य करातील सवलत योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने सदर योजनेची सवलत दि ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
तसेच जे मिळकत धारक थकबाकी सह ( अवैध बांधकाम व शास्ती कराची रक्कम वगळून ) संपुर्ण मिळकतीची एक रक्कमी १००% रक्कम भरणा करतील त्यांना आकारण्यात आलेल्या विलंब दंड रक्कमेच्या ९०% सवलतीच्या अभय योजनेसही ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
“पिंपरी चिंचवड मधील मिळकतधारकांनी महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयामध्ये रोख धनादेश डी डी द्वारे कर भरणा करता येईल, तसेच महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर भरणा करता येईल. तरी मिळकतधारकांनी दि ३१ ऑगस्ट २०२० पुर्वी एक रक्कमी मिळकतकराचा भरणा करुन सामान्य करातील विविध  सवलत योजनेचा लाभ घ्यावा”.
— रमेश वस्ते, प्रशासन अधिकारी, करसंकलन,
पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी, पुणे – ४११०१८
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.