महाबुलेटीन न्यूज
बीड : मराठीतील मान्यवर संपादक, पत्रकारांचे कायम स्मरण राहावे यासाठी त्यांची नावं वृक्षांना देण्याचा अभिनव उपक्रम वडवणी तालुक्यातील (बीड जिल्हा) देवडी येथे आयोजित करण्यात आला होता. झाडांना दिवंगत पत्रकारांची नावं देऊन त्यांच्या स्मृती जतन करण्याची कल्पना…. हा उपक़म राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिलाच उपक्रम आहे. बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषद आणि वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आज या कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक़मास बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अजित कुंभार, दै. चंपावतीपत्रचे संपादक नामदेवराव क्षीरसागर, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर, कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सुभाष चौरे, मराठी पञकार परिषदेचे झुंझार शिलेदार अनिलजी वाघमारे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, सोशल मिडीया सेल प्रमुख सुनील वाळुंज, पुणे जिल्हा महिला प्रतिनिधी श्रावणी कामत यांच्यासह बीड जिल्हा व वडवणी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.