महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
शिंदे वासुली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तालुका अध्यक्ष अतुल देशमुख आणि भाजपा गटनेते शरद बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. सेवा सप्ताह अंतर्गत चाकण बस स्थानक, सिद्धेश्वर मंदिर राजगुरुनगर येथे स्वच्छता अभियान, पाईटच्या श्री क्षेत्र कुंडेश्वर परिसरात वृक्ष लागवड, ७० दिव्यांगांना आरोग्य साहित्य वाटप आणि महाळुंगे इंगळे कोविड सेंटर येथे फळ वाटप असे विविध सामाजिक विधायक उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी चाकण शहराध्यक्ष अजय जगनाडे, गुलाबराव खांडेभराड, प्रीतम शिंदे, बाळासाहेब नाणेकर, चाकण शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रतीक गंभीर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख संदेश जाधव, राजगुरुनगर युवा मोर्चा शहराध्यक्ष मयुर होले, संघटन सरचिटणीस चेतन बर्गे, सरचिटणीस सागर राळे, सरचिटणीस संदीप दसगुडे, उपाध्यक्ष केतन लगड, उपाध्यक्ष दत्ता वनगरे, पंचायत समिती गण अध्यक्ष नसीम पठाण, प्रथमेश राळे, शरद निखाडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजयशेठ रौंधळ, कोये गावचे विद्यमान उपसरपंच सागर राळे , ग्रामपंचायत सदस्य विजय सावंत , ग्रामपंचायत सदस्य संतोष देवकर, चेअरमन तुकाराम सावंत, भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस संदिप दजगुडे, भाजपा युवा मोर्चाचे राजगुरूनगर शहराध्यक्ष मयुर होले, विशाल तोत्रे , सौरभ तोत्रे आणि भाजपा युवा मोर्चाचे अनेक आदी पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
देशामध्ये कोरोनाने थैमान घातले असताना करोनाच्या बिकट परिस्थितीत अनाठायी खर्च न करता लोकाभिमुख, विधायक, लोकहिताचे सामाजिक उपक्रम राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा करण्याच्या पक्षाने दिलेल्या सूचनेप्रमाणे खेड तालुका भाजपा युवा मोर्चाने सेवा सप्ताहाचे आयोजन केले होते. आठवडाभर तालुक्यातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. १७ तारखेला चाकण एसटी स्टॅण्ड व राजगुरुनगर येथील श्री क्षेत्र सिध्देश्वर मंदिर परिसर स्वच्छता करून अभियानाला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, भाजयूमो तालुकाध्यक्ष काळूराम पिंजण, भाजपा खेड तालुका उपाध्यक्ष सुनिल देवकर, भाजयूमोचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करणार असल्याचे भाजयूमोचे तालुकाध्यक्ष काळूराम पिंजण यांनी सांगितले. संदेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले व चेतन बर्गे यांनी आभार मानले.
—
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.