क्रीडा

निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यायाम आवश्यक : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

 

महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. सायकलिंग हा त्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे, असे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नरुटवाडी ( ता. इंदापूर ) येथे बोलताना व्यक्त केले.

इंदापूर सायकल क्लब व युवा क्रांती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त इंदापूर शहरातून कोरोना व सायकल अवेरनेस रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते नरुटवाडी येथून या रॅलीचा आरंभ झाला. त्यांनी या रॅलीत सक्रीय सहभाग घेतला.

राज्यमंत्री भरणे म्हणाले की, निरोगी आयुष्य जगण्यासाठी, कोरोनासारख्या साथीच्या रोगांपासून दूर राहण्यासाठी चालणे, धावणे, सायकलिंग, पोहणे, योगा हे विविध व्यायाम प्रकार करणे आवश्यक आहे.

युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक प्रशांत सिताप यांनी प्रास्ताविकात युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली. इंदापूर सायकल क्लबचे संस्थापक अध्यक्ष सुनील मोहिते यांनी सायकल क्लबची स्थापना, उद्देश, क्लबच्या वतीने राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली.

स्वातंत्र्यदिनानिमित्त दीर्घ पल्ल्याचे सायकलिंग करणा-या सुनील मोहिते, प्रशांत सिताप, दशरथ भोंग, रमेश शिंदे, अस्लम शेख, चांद पठाण, मेहबूब मोमीन, स्वप्निल सावंत, संजय गायकवाड, मेजर महादेव सोमवंशी, अनिल जाधव, डॉ. पंकज गोरे, डॉ.संजय शिंदे, डॉ.ऋषिकेश गार्डे, स्वप्नील गलांडे, प्रतीक रेडके, अवधूत पाटील, उमेश राऊत, ज्ञानदेव डोंगरे, सिद्धार्थ वाघमारे, आदित्यराज मोहिते आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

आनंद देशपांडे, तुकाराम बानकर, कुशल कोकाटे, सचिन परबते, बाळासाहेब वेदपाठक, प्रितेश भरणे, विनायक वाघमारे यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. रमेश शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर कुशल कोकाटे यांनी आभार मानले.

 

इंदापूरच्या तेजस्विनी उकिरडे या विद्यार्थिनीच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी मदत म्हणून भरणे कुटुंबीयांकडून पन्नास हजार रुपयाची मदत देण्याचे या वेळी राज्यमंत्री भरणे यांनी जाहीर केले. पियुष बोरा, धरमचंद लोढा,मिलिंद कौलगी, महादेव लोखंडे इत्यादिंच्या वतीने तेजस्विनीला मदतीचे धनादेश देण्यात आले.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

24 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.