कृषी

निमगाव – दावडीत कांदालागवड जोमात

महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव

राजगुरूनगर : खेड तालुक्याच्या पूर्व भागात कांदा लागवड जोमात सुरू झाली आहे. तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील होलेवाडी, खरपुडी, रेटवडी, निमगाव, दावडी, काळुस, शेलपिंपळगाव हा परिसर कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रामध्ये रब्बी हंगामातील महत्वाचे पीक म्हणजे कांदा. दरवर्षी रब्बी हंगामात या भागात कांद्याला बाजारभाव मिळो अथवा ना मिळो, पण येथील शेतकरी कांद्याचे पीक घेतल्याशिवाय राहात नाही. सुदैवाने गेल्यावर्षी  कांद्याचे पीक जोमात येऊन त्याला बाजारभावही चांगल्या प्रकारे मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा सुधारल्याचे चित्र दिसून येते. 

दावडी गावाच्या जाधववाडी येथे नवनाथ गणपत जाधव,  रामदास खंडू जाधव, बाजीराव निवृत्ती जाधव यांनी सांगितले की, गतवर्षी आम्हाला कांद्याला बाजार भाव चांगला मिळाल्यामुळे आमची पूर्वीची ढासळलेली आर्थिक परिस्थिती सावरण्याची संधी मिळाली. यंदा पर्जन्यवृष्टी योग्यप्रकारे झाल्यामुळे कांदा लागवडीपासून ते कांदा काढणी पर्यंत विहिरींचा पाणीसाठा पुरेसा असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या परिसरात बर्‍याच शेतकऱ्यांची कांदा लागवड उरकली असून काहीजण जमीन तयार करून नंतर  कांदे लागवड करण्याच्या तयारीत आहेत. कांदा लागवडीसाठी अगोदर रोपं तयार करावी लागतात. त्यासाठी किमान पंधराशे ते अठराशे रुपये किलोच्या भावाने बी विकत घेऊन टाकावे लागते. नंतर रोपे उपटून लागवड करणाऱ्या मजुरांना तीनशे रुपये रोज द्यावा लागतो. तसेच त्यांना त्यांच्या घरापासून  आपल्या शेतापर्यंत  ने – आण करण्यासाठी गाडी भाडे द्यावे लागते. त्यांच्यासाठी स्वच्छ पाण्याच्या जारची व्यवस्थाही करावी लागते. काही ठिकाणी त्यांच्या जेवणाचीहि व्यवस्था करावी लागते. कांदा लागवड ते कांदा काढणी या प्रक्रियेमध्ये रोपं, खत, पिकाला पाणी देणे, खुरपणी करणे, औषध फवारणी करणे इत्यादी गोष्टींसाठी बरेच पैसे खर्च करावे लागतात. आणि हे सर्व करून जर बाजारभाव चांगला मिळाला तर ठीक; नाही तर मग आमचे सर्व आर्थिक गणित कोलमडते. व संपूर्ण हंगाम व मेहनत कवडीमोल ठरते. बाजारात सर्व गोष्टींचे हमीभाव ठरलेले असून; आमच्याच म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला
हमीभाव का मिळत नाही ? अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यासाठी शासनाने कांद्याला हमीभाव दिल्यास आम्हाला चिंता उरणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 30 Apr 2026

बुधवार, २९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 30 Apr 2026

मंगळवार, २८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 28 Apr 2026

सोमवार, २७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भामास्केट…

6 days ago

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

7 days ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

7 days ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

This website uses cookies.