निधन वार्ता

निधन वार्ता : अँड. रतनराव भगवानराव काकडे-देशमुख

महाबुलेटीन न्यूज / विनोद गोलांडे
बारामती : तालुक्यातील निंबुत गावचे सुपुत्र, सहकाराचे  अभ्यासु व्यक्तिमत्त्व तसेच कै. भगवानराव साहेबराव काकडे-देशमुख यांचे चिरंजीव बारामती पंचायत समितीचे मा. सदस्य अँड. रतनराव काकडे-देशमुख यांचे रविवारी ( दि. २ ऑगस्ट ) रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे एल. एल. बी. चे शिक्षण पुण्यातील लाँ कॉलेजला झाले. त्यांनी बारामती येथे वकीली केली ते सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ऑफिस सुप्रीटेंड व प्रोजेक्ट ऑफिससर होते. तसेच नीरा व्हॅली सहकारी डिस्टरलीचे कार्यकारी संचालक होते. त्याचप्रमाणे बारामती तालुका पंचायत समितीचे सदस्य ही होते. त्यानंतर त्यांनी बारामती विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवली होती. ते श्री बाबालाल काकडे निरा कॅनॉल खरेदी विक्री संघाचे संचालक ही झाले. त्याचप्रमाणे भगवानराव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे त्यांनी चेअरमनपद ही भूषवले. अशा अनेक मानाच्या पदावर त्यांनी काम केले होते. त्यांच्या जाण्याने नीरा, निंबुत सह सोमेश्वरनगर परिसरात हळहळही व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील बागायतदार ऋतुराज काकडे व भगवानराव विविध कार्यकारी सोसायटी खंडोबाचीवाडीचे अध्यक्ष ऋषिकेश काकडे यांचे ते वडील होत.
———————
दशक्रिया विधी:
गुरुवार, दिनांक ६/८/२०२० रोजी निंबुत, ता. बारामती येथे होणार आहे.
शोकाकुल : काकडे-देशमुख परिवार, निंबुत ( ता. बारामती )
admin

Recent Posts

MahaBulletin — 18 Jun 2026

बुधवार, १७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ मोठे…

13 hours ago

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

4 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

5 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

6 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

7 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

1 week ago

This website uses cookies.