आरोग्य

‘या’ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर

 

अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार-रुग्णांची होतेय हेळसांड

महाबुलेटीन न्यूज : संतोष म्हस्के  
भोर : तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील नेरे ता. भोर येथे शासनाने परिसरातील ४५ गावच्या रुग्ण सेवेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून आद्यवत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे. मात्र येथील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांना वेळच्यावेळी सेवा मिळत नाही. यामुळे परिसरातील रुणांची हेळसांड होत असून आरोग्य केंद्रच सलाईनवर असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अनिल सावले यांना पाहणीत दिसून आल्याचे संताप व्यक्त करून सांगण्यात आले.

    आरोग्य केंद्रात शासनाने कायमस्वरूपी दोन आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. येथे अधिकाऱ्यांची निवासाची सोय करण्यात आली असली तरी अधिकारी वर्ग भोर येथे निवासास असल्याने दुपारनंतर व रात्रीच्यावेळी आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे प्राथमिक आरोग्यकेंद्र नेरे असून नसल्यासारखे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारच्या आजारावरील रुग्ण येथे येत असतात, मात्र डॉक्टरांअभावी उपचार होत नसल्याने रुग्णांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

आरोग्य केंद्राचा परिसर दुर्गम डोंगरी असल्याने रात्री-अपरात्री रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. मात्र वैद्यकीय अधिकार दुपारी दोन नंतर उपलब्ध होत नाहीत. यामुळे रुग्णांना येथीलच परिचरिकांकडून उपचार करून घ्यावे लागतात. या उपचारा दरम्यान एखादा रुग्ण दगावल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनेकवेळा आरोग्य केंद्रात अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने पूर्ण केंद्रात कुत्र्यांचा वावर असतो. मागील आठवड्यात रात्रीच्या वेळी एक सर्पदंशचा व दोन प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांना नातेवाईकांनी फोन करून सांगूनही उपस्थित न राहिल्याने परिचरिकेला उपचार व या दोन महिलांची प्रसूती करावी लागली. असे रुग्णांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.

नेरेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे व प्रभारी तालुका वैध्यकीय अधिकारी डॉ. संजय भारती यांनी माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नेरे परिसरातील तरुणांकडून होत आहे.

वैद्यकीय प्रवास प्रमाणपत्र घ्यावे लागले विकत :-
———
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता दिल्याने नागरिकांना वैद्यकीय प्रवास प्रमाणपत्र घेऊन प्रवासासाठी मुभा देण्यात आली होती. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नेरे आरोग्य केंद्रात गेलेल्या नागरिकांकडून अधिकाऱ्यांनी ठराविक रक्कम घेण्यात आल्याचे उघड झाले आहे. प्रमाणपत्र फुकट असतानाही पैसे घेतल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष व सभापतींचे दुर्लक्ष :-
——
पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे व सभापती श्रीधर किंद्रे यांच्या गणात व गटात नेरे प्राथमिक आरोग्य केंद्र येत असून दोन्ही पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांचे फावले असल्याचे नागरिकांनी सांगितले.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

3 days ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 days ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

6 days ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

7 days ago

MahaBulletin — 05 May 2026

सोमवार, ४ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकांवरील…

1 week ago

MahaBulletin — 30 Apr 2026

बुधवार, २९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

2 weeks ago

This website uses cookies.