आरोग्य

नारायणगाव येथे शिवनेरी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्रास मान्यता

सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांची माहिती
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
महाबुलेटीन न्यूज / किरण वाजगे
नारायणगाव : येथे सहकारी तत्त्वावर शिवनेरी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्रास मान्यता मिळाली असल्याची माहिती जुन्नरच्या सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांनी दिली.
मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी ग्रामीण  भागातून होणारी गर्दी कमी व्हावी, तसेच त्या त्या भागातील स्थानिक ठिकाणी रुग्णांना माफक दरात उपचार मिळावेत, या हेतूने नारायणगाव ( ता. जुन्नर ) येथे शिवनेरी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र सुरू करण्यात आले असून त्यास जुन्नर सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील सहकारी तत्वावर सुरू होणारे शिवनेरी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र हे पहिले हॉस्पिटल आहे. या संस्थेचे मुख्य प्रवर्तक म्हणून डॉ. हनुमंतराव भोसले व सचिव म्हणून डॉ. रामदास उदमले हे काम पाहणार आहेत.
संपूर्ण जगात कोविड 19 या रोगाने थैमान घातले आहे. कोरोना बाधीत रुग्णांना उपचार मिळावेत व शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा, म्हणून कोरोना बाधीत रुग्णांना उपचार देण्यासाठी नियोजित कोविड सेंटर सुरू करण्यासाठी सहकार तत्वावर हे सहकारी रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाढती लोकसंख्या पाहता व आरोग्य विभागात होत असलेले आर्थिक शोषण थांबविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील सर्व गरीब व गरजूंना अत्यल्प दरात उपचार मिळावेत हा देखील एक भाग आहे.
शिवनेरी सहकारी रुग्णालय  व संशोधन केंद्र  या संस्थेमार्फत सामाजिक रोग प्रतिबंधक अंतर्गत सामाजिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी निरनिराळे उपक्रम राबविणे, केंद्र व राज्य शासनाचे उपक्रम चालू ठेवणे. रुग्णालयांच्या बाबतीत प्रशिक्षित नर्सेसचा तुटवडा नेहमीच भासतो म्हणून रुग्णालयासबंधी पॅरामेडिकल स्टाफ करीता प्रशिक्षण केंद्र चालविणे, नर्सिंग कोर्सेस बी. पी. एन. ऍक्युप्रेशर थेरपी, स्वच्छता निरीक्षक, डी.एम.एल.टी. हॉस्पिटल मॅनेजमेंट, पब्लिक अनहेल्थ एज्युकेशन, नर्सिंग सेवक, प्रशिक्षण कोर्सेस सुरू करणे, एम. बी. बी. एस. डेंटल, फिजिओथेरपी कॉलेज या सारख्या वैद्यकीय शिक्षण संस्था चालविणे, नागरिकांना चांगले रुग्णालय, दवाखाना अध्यापन, शास्त्रीय, वैद्यकीय तसेच शल्यचिकित्सक मार्गाने योग्य आकारात वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे, नागरिकांना शैक्षणिक सवलती मिळून देणे, आपले आरोग्य कसे ठेवावे याबाबत त्यांना मार्गदर्शन करणे, समाजात आदर्श डॉक्टर निर्माण करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या पूर्ततेसाठी वैद्यकीय शिक्षण सुलभ व्हावे व त्याच्या प्रसारासाठी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे व वैद्यकीय शिक्षणाचे वर्ग चालविणे, वैद्यकीय साहित्याचे उत्पादन, खरेदी विक्री योग्य दराने करणे असे या संस्थेचे उद्दिष्ट आहेत, अशी माहिती सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांनी दिली.
admin

Recent Posts

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

14 hours ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

2 days ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

This website uses cookies.