महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : स्वच्छ सर्वेक्षणात इंदापूर नगरपरिषदेचा देशपातळीवर प्रथम क्रमांक आणण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्धार नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी आज (दि.२४ ऑगस्ट) व्यक्त केला.
स्वच्छ सर्वेक्षणात इंदापूर नगरपरिषदेने देशपातळीवर सलग तिस-यांदा यश मिळवले. त्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की,या यशामुळे इंदापूर शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे. शहरातील सर्व नागरिक,व्यापारी,समाजसेवी संस्था,मंडळे,शाळा, महाविद्यालय,नगरपरिषदेचे कर्मचारी हे या यशाचे खरे मानकरी आहेत. पुढील काळात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे.
मुख्याधिकारी डॉ प्रदीप ठेंगल म्हणाले की,स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सर्वांनी चांगले काम केले आहे. या कामात शेवटच्या व्यक्तीपासून ते सर्व पदाधिका-यांपर्यंत सर्वाचे योगदान खुप मोठे आहे. गुणात्मक वाढीसाठी सर्वांच्या सहकार्याने अधिकचा प्रयत्न करण्यात येईल.
अचुक नियोजन,तंत्रशुद्ध माहितीद्वारे पुढील स्वच्छ सर्वेक्षणात अधिक गुण मिळवण्याचा प्रयत्न व्हावा,असे मत इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नगरसेवक भरत शहा, नगरसेविका मीना मोमीन,जावेद शेख,नितीन मखरे,हमीद आत्तार या वेळी उपस्थित होते. अल्ताफ पठाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्रद्धा वळवडे यांनी आभार मानले.
____________________
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.