पुणे जिल्हा

मुलीला पळवून नेल्याप्रकरणी प्रियकरासह दोघांचा निर्घृण खून ● खेड तालुक्यातील करंजविहिरे येथील घटना, खुनाचा गुन्हा दाखल, ६ जणांना अटक

मुलीला पळवून नेल्याप्रकरणी प्रियकरासह दोघांचा निर्घृण खून
● खेड तालुक्यातील करंजविहिरे येथील घटना, खुनाचा गुन्हा दाखल, ६ जणांना अटक

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क 
चाकण : २१ वर्षीय मुलीला पळवून नेल्याच्या रागातून प्रियकरासह दोन जणांचा काठ्या व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून निर्घृण खून केल्याची घटना खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील करंजविहिरे गावात घडली आहे या घटनेमुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत व पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा सुरू आहे.

करंजविहीरे ( ता. खेड ) येथे एका २१ वर्षीय तरुणीला प्रियकराने पळवून नेले असता त्यांना मुलीच्या नातेवाईकांनी हॉटेल माणुसकी येथे बोलावून घेतले असता बेदम मारहाण केली. यात प्रियकरासह त्याच्या मित्राचा मृत्यू झाला असून प्रेयसीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण ६ जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील करंजविहिरे (ता.खेड ) येथील हॉटेल माणुसकीच्या समोर हॉटेल मालक बाळू मरगज यांची वीटभट्टी आहे. वीटभट्टीवर काम करणारे कामगार बाळू सिताराम गावडे (वय 26 वर्ष रा.आसखेड खुर्द,ता. खेड, जि. पुणे) व राहुल दत्तात्रय गावडे (वय 26 वर्ष, रा.आसखेड खुर्द, ता. खेड, जि. पुणे) यांनी हॉटेल मालक यांची २१ वर्षीय मुलीला बाळू सिताराम गावडे यांनी पळून घेऊन गेले होते. मुलगी व पळून नेणारे बाळू, राहुल यांचा नातेवाईकांनी शोध घेऊन त्यांना हॉटेल माणुसकी या ठिकाणी आणून लाकडी काठी, लोखंडी रॉड यांनी बेदम व अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत बाळू व राहुल या दोघांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी त्याठिकाणाहून पळ काढला. मात्र पोलिसांनी अनिल संभाजी कडाळे, राजू साहेबराव गावडे, किरण बाळू मेंगाळ, चंद्रकरा उर्फ मुक्ता बाळू गावडे, आनंदा सीताराम जाधव, बाळू मरगज ( हॉटेल मालक ) यांना अटक केली आहे.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत हे अधिक तपास करीत आहेत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

13 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.