सण-उत्सव

महाबुलेटीन रक्षाबंधन स्पेशल : अलंकापुरी मंदिरात रक्षाबंधन दिनी मुक्ताईची ज्ञानदेवांना राखी अर्पण

महाबुलेटीन न्यूज / अर्जुन मेदनकर
आळंदी : येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात रक्षाबंधन दिनी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्या वतीने माउलींना पाठविलेली मुक्ताईची राखी श्रींचे संजीवन समाधीला स्पर्श करीत अर्पण करण्यात आली.
मंदिरात श्रींना राखी अर्पण करीत आळंदी मंदिरात कोरोनाचे पार्शवभूमीवर रक्षाबंधन दिन व श्रावणी सोमवार दिनी परंपरेने धार्मिक कार्यक्रम पूजा उपचार झाले. मंदिर भाविकांना देवदर्शनास बंद असल्याने नेहमी होणारी गर्दी यावर्षी झाली नाही.
आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अँड. विकास ढगे पाटील यांनी देवस्थान तर्फे रक्षाबंधन दिनी मुक्ताईची माऊलींचे साठी आलेली राखी ह.भ.प.गजानन महाराज लाहुडकर यांचे हस्ते स्वीकारली. रक्षाबंधन दिनाची येथील परंपरा श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्या वतीने पाटील यांनी श्रींना राखी पाठवीत कायम ठेवली. यावेळी आळंदी देवस्थानचे वतीने प्रमुख विश्वस्त अँड. विकास ढगे पाटील यांनी श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानचा सन्मान गजानन महाराज लाहुडकर यांना श्रीफळ प्रसाद भेट देऊन सत्कार केला. या प्रसंगी विचारसागर महाराज लाहुडकर, हर्षदा लाहुडकर, व्यवस्थापक माउली वीर, सेवक भीमा वाघमारे आदी उपस्थित होते.
admin

Recent Posts

MahaBulletin — 21 Jun 2026

शनिवार, २० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 🛣️ पुणे-नाशिक…

1 day ago

MahaBulletin — 20 Jun 2026

शुक्रवार, १९ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुणे-नाशिक…

2 days ago

MahaBulletin — 19 Jun 2026

गुरुवार, १८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 18 Jun 2026

बुधवार, १७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ मोठे…

4 days ago

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

1 week ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

1 week ago

This website uses cookies.