महाबुलेटीन न्यूज : किशोर कराळे
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात राज्यातील काही शहरांमध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या स्थानिक प्रशासनाच्या अडचनी वाढवताना दिसत आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जे जे रुग्णालयात लस घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना लस संदर्भात भीती न बाळगण्याचे आवाहन केले होते. तसेच त्यांनी पुन्हा एकदा कडक लॉकडाउनचा इशारा दिला आहे. येत्या एक दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कदाचित काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाउन करावा लागेल. त्यामुळे लसीकरण करुन घ्या, बाहेर अनावश्यक गर्दी टाळा, विनाकारण बाहेर येणं-जाणं टाळा, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
——–
बुधवार, २९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…
मंगळवार, २८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…
सोमवार, २७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भामास्केट…
रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…
शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
This website uses cookies.