महाबुलेटीन न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : येथील निसर्गप्रेमी मिलींद संपतराव शेलार यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ ( महाराष्ट्र ) या संस्थेच्या ‘सदस्यपदी’ नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष, वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र शेलार दिले आहे. ही निवड २०२० ते २०२५ या कालावधी साठी करण्यात आली आहे.
मिलींद शेलार हे महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे सहसचिव म्हणून कार्यरत असून रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे खजिनदार आहेत. येथील श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सचिव असून या संस्थांच्या माध्यमातून शेलार यांनी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाच्या कार्यात सातत्य राखले आहे. पर्यावरण संरक्षण, संवर्धना संदर्भात त्यांनी जनजागृती केली आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या दुहूरोड येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालायात ते ‘कलाशिक्षक’ म्हणून कार्यरत आहेत.
पर्यावरण संरक्षण, संवर्धना संदर्भात त्यांनी जनजागृतीही केली आहे.
——-
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.