पुणे जिल्हा

मावळ तालुक्यातील पवना धरणात 47 टक्के पाणीसाठा

मागील 24 तासात पाणीसाठ्यात 4.55 टक्के वाढ
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पवनानगर : मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवन मावळातील पवना धरण लवकरच पन्नाशी गाठणार आहे. धरण परिसरात मागील चोवीस तासात 37 मिमी पाऊस झाला असून पाणीसाठ्यात 4.55 टक्के वाढ झाली आहे. धरणाचा पाणीसाठा काल सकाळपर्यत 46.73 टक्के इतका झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यत पवना धरणात 94.17 टक्के इतका पाणीसाठा होता.
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
  यावर्षी जुन महिन्याच्या सुरूवातीला काही काळ पाऊस झाल्यानंतर मध्यंतरी बराच काळ पावसाने उघडीप दिली होती. पवना धरण क्षेत्रात यावर्षी आजपर्यत केवळ 755 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीची तुलना करिता हा पाऊस तीन पट कमी असला तरी  सोमवारपासून मावळात पावसाला समाधानकारक सुरूवात झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. पावसा अभावी रखडलेल्या भात शेतीच्या कामांना पुन्हा वेग आला आहे.
   मे महिन्याच्या अखेरीस पवना धरणातील पाणीसाठा 35.29 टक्क्यावर आला होता. पावसाला जोर मिळत नसल्याने पिंपरी चिंचवड भागात ऐन पावसाळ्यात पाणी कपात करण्याची शक्यता निर्माण झालेली असताना पावसाचे झालेले पुर्नरागमन सर्वांसाठी दिलासादायक असे आहे. 1 जुन पासून पवना धरणाच्या पाणीसाठ्यात 11.44 टक्के वाढ झाली आहे.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Sep 2026

रविवार, २० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ जिल्हा…

5 hours ago

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

1 day ago

MahaBulletin — 19 Sep 2026

बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

5 days ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

1 week ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

1 week ago

This website uses cookies.