संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका एस टी बसने पंढरपूरला मार्गस्थ, माऊली-माऊली गजराने अलंकापुरी दुमदुमली

महाबुलेटीन नेटवर्क / श्रीकांत बोरावके
आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुका यंदा कोरोनामुळे पालखी व रथा ऐवजी मोजक्याच लोकांच्या उपस्थित लालपरी एस.टी.ने पंढरपूरला मार्गस्थ झाल्या.
सतरा दिवसांचा आजोळघरातील मुक्काम हलवून मंगळवारी ( दि.३० ) रोजी दुपारी सव्वा एक सुमारास देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील, विश्वस्त, सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी माऊलींच्या पादुका हरिनामाचा गजरात पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्यांनी एस. टी. बस पर्यंत चालत जात पादुका मोजक्या वीस लोकांच्या समवेत हरिनाम, टाळ – मृदुंगाच्या गजरात एस. टी. महामंडळाच्या विठाई बसचे स्वरूप असलेल्या एस. टी. बसमध्ये विराजमान केल्या. बसवर भाविकांनी पुष्पवृष्टी केली. माऊली – माऊली गजराने यावेळी परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड.विकास ढगे पाटील, विश्वस्त अभय टिळक, सोहळा प्रमुख योगेश देसाई, सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, बाळासाहेब चोपदार, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, अशोकराव कांबळे, राहुल चिताळकर व मानकरी, वारकरी, भाविक उपस्थित होते.
मंगळवारी ( दि. ३० ) पहाटे  माउलींच्या पादुकांवर पवमान पूजा व दुधारती झाल्यानंतर दुपारी बारा ते साडेबारा वाजता महानैवेद्य दाखविण्यात आला, त्यानंतर पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ करण्याच्या विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी सहापर्यंत आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पादुका सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास पंढरपूरला पोचणार आहेत. देवस्थानला पादुकांसोबत वीस जण नेण्याची परवानगी देण्यात आली होती. यात उर्जितसिंह शितोळे सरकार, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, प्रमुख विश्वस्त ऍड.विकास ढगे पाटील, सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, पुजारी, चोपदार, चवरीवाले, अब्दागिरीसह काही मानकरी, दिंडी प्रमुख, विणेकरी समाविष्ट होते.
admin

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

3 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.