किती हार पुष्पगुच्छ
किती स्विकारु सन्मान
आई तुझ्या आशिर्वाद
झालं जीवनाचं गाणं ॥धृ॥
गाण्या वाचून जीवन
नाही याचं आलं भान
आई तुझे हे संस्कार
आलं त्यातून हे ज्ञान ॥१॥
झाले यशस्वी हे यश
तुझ्या आशिषाचे धन
केले तुझियाच नावे
आई माझे यशोधन॥२॥
माझ्या यशाचं हे गाणं
बघ ऐकलं जगानं
कुणी केलासे सन्मान
कुणा वाटे अभिमान॥३॥
पणं ऐकवू कसं ग
आई तुला माझं गाणं
माझ्या यशाचं हे गाणं
आई माझे यशोगान॥४॥
— निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
🌼🙏🌼 🙏🌼🙏 🌼🙏🌼
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.