महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
मंचर : दि. ९ सप्टेंबर रोजी मंचर शहरात ५०० जणांचा समावेश असलेल्या १११ पथकांनी सहा हजार कुटुंबांची वैद्यकीय तपासणी केली. त्यापैकी ११११ संशयित रूग्णांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये १७६ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर उर्वरित तालुक्यात ३३ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत.
तालुक्यात २०९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये मंचर १७६, भावडी १, साल १, चास २, अवसरी खुर्द ८, पेठ ७, चांडोली खुर्द ३, कळंब ३, चांडोली बुद्रुक १, पारगाव तर्फे खेड १, निघोटवाडी २, गंगापूर खुर्द १, मेंगडेवाडी १, खडकी १, जारकरवाडी १ यांचा समावेश आहे. तर दि. ९ रोजी एका कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज ४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
त्यामुळे आजपर्यंत आंबेगाव तालुक्यातील कोरोना बाधितांची एकुण संख्या १७३४ झाली आहे. आजपर्यंत ९५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत ४८ कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे तर ७३२ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.
डॉक्टर, परिचारिका, स्वयंसेवक, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, पर्यवेक्षक, आशा वर्कर व पोलिस यांचा समावेश असलेल्या १११ पथकांनी घरोघरी जाऊन ऑक्सीमिटर, थर्मामिटर गनद्वारे सर्वेक्षण केले.
‘या सर्वेक्षणाला मंचरकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मंचर शहरात आढळून आलेल्या १७६ कोरोना बधितांना आजाराच्या तीव्रतेनुसार वर्गवारी करून तीन रुग्णवाहिकेतून अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड सेंटर, मंचर उपजिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये व भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.” – जालिंदर पठारे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, आंबेगाव
“मंचर शहरामध्ये अजूनही कोणाची वैद्यकीय तपासणी झाली नसेल, तर त्यांनी लक्षणे जाणवत असतील तर अंगावर त्रास न काढता मंचर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी”
– सारंग कोडलकर, उपविभागीय अधिकारी, आंबेगाव-जुन्नर
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.