महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : महावितरण कंपनीकडुन अवाजवी वीजबिलांची आकारणी केली जात असल्याने राजगुरुनगर, चांडोली येथील महावितरण कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत तोडफोड केल्याची घटना आज ( दि. ९ सप्टेंबर ) दुपारी घडली. या घटनेनंतर राजगुरुनगर पोलीसांनी महावितरण कार्यालयाची पहाणी केली.
पुण्याच्या ग्रामिण भागात कोरोनाच्या महामारीने हाहाकार माजला आहे. अनेकांच्या हाताला काम नसुन सामान्य नागरिक घरात बसुन आहेत. त्यातच वीज बीले वाढीव आल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आठ दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण कार्यालयास याबाबत निवेदन दिले होते. यासंदर्भात कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज घोषणाबाजी करत वीज वितरण कार्यालयाची खुर्च्यांनी तोडफोड केली.
—–
गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…
सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
This website uses cookies.