महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खराबवाडी गावचे सुपुत्र, भारत-पाकिस्तान युद्धात शौर्य गाजविलेले माजी सैनिक मारुती किसन खराबी ( वय ६९ ) यांचे आज ( दि. ५ ऑक्टोबर ) अकस्मिकपणे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक गणेश खराबी व संतोष खराबी यांचे ते वडील होत.
१९७१ साली भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी शत्रूंना लढाईच्या मैदानावर पळता भुई थोडी केली होती. यावेळी शत्रूच्या एका सैन्याने त्यांच्यावर बंदुकीची गोळी झाडली असता ती गळ्यातून आरपार गेली होती, त्यात ते जखमी झाले होते. त्यांच्या शौर्याबद्दल भारत सरकारने त्यांचा सन्मान करून बक्षीसही दिले होते. हे युद्ध भारताने जिंकले होते. या युद्धात त्यांचे अनेक सहकारी शहीद झाले असताना ते गंभीर जखमी होऊनही या घटनेतून बचावले होते. ते युद्धातील अनुभवाचे थरार सांगताना अंगावर रोमांच उभे राहत असे.
रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…
शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
This website uses cookies.