दिल्ली

माजी खासदार बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंकडुन विचारपूस

माजी खासदार बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंकडुन विचारपूस

महाबुलेटीन न्यूज । विशेष प्रतिनिधी
मुंबई दि. 13 : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे कळताच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांचे लहान भाऊ भीमराव आंबेडकर यांना दूरध्वनी करून आस्थेने माहिती घेतली. प्रकाश आंबेडकर रुग्णालयात असून त्यांना लवकर डिस्चार्ज मिळेल. ते घरी आल्यानंतर त्यांची भेट घेऊ असे ना रामदास आठवले यांनी भीमराव आंबेडकर यांना सांगितले.

प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडी तर रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वाचे आंबेडकरी जनतेवर गारुड करून आहेत. या दोन नेत्यांची राजकीय वाटचाल वेगवेगळी राहिली असली तरी दोघांमध्ये आपलेपणाची जाणीव असल्याची प्रचिती दोघा नेत्यांनी दाखविली आहे.प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी झाल्याचे कळताच रामदास आठवले यांनी भीमराव आंबेडकर यांना दूरध्वनी करून प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी करून त्यांची काळजी घ्या, मी लवकर भेटायला येईन असा निरोप दिला. भीमराव आंबेडकर यांनीही ना. रामदास आठवले यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या मातोश्री हौसाआई आठवले यांचे 2018 मध्ये निधन झाले तेंव्हा मातोश्री हौसाआई यांच्या अंत्ययात्रेत प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिले होते. 

आता प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी झाली असल्याचे कळल्यानंतर ना. रामदास आठवले यांनी आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, राजकीय वाटचाल काहीही असो; पण आपलेपणा जोपासत रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीत लवकर चांगली सुधारणा होवो, आपण लवकर त्यांची भेट घेऊ, असा भीमराव आंबेडकर यांना दूरध्वनी करून निरोप दिला.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 02 Aug 2026

शुक्रवार, ३१ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आज…

11 hours ago

MahaBulletin — 31 Jul 2026

गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 29 Jul 2026

मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

4 days ago

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

6 days ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

1 week ago

This website uses cookies.