महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
शिरूर : तालुक्यातील न्हावरे येथे घराच्या बाजूला शौचास गेलेल्या महिलेवर अज्ञात व्यक्तीनं विनयभंग करण्याच्या हेतूनं प्राणघातक हल्ला करून तिचे दोन्ही डोळे निकामी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या क्रूर कृत्यानं न्हावरे परिसरात महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
न्हावरे येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाला. महिला घराच्या बाजूला शौचास गेली असता तिच्यावर अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला. या हल्ल्यात पीडित महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. महिला या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध विनयभंग करून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.सदर पीडित महिला 37 वर्षांची असून ती आपल्या पतीसमवेत न्हावरे येथील पत्र्याच्या खोलीत वास्तव्य करते. मंगळवारी महिला रात्री नऊच्या सुमारास घराच्या बाजूला शौचास गेली होती. त्यावेळी बाजूला असणाऱ्या झुडपात दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तीनं तिची छेड काढली. यावेळी महिलेने प्रतिहल्ला केल्यानंतर संतप्त व्यक्तीने महिलेवर प्राणघातक हल्ला करत तिचे दोन्ही डोळे निकामी केले.
या घटनेची गंभीर दखल पुणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी घटनास्थळाची बुधवारी दुपारी पाहणी केली. महिलेवर झालेला जीवघेणा हल्ला का व कशासाठी केला, याचा तपास शिरूर पोलिसांकडून सुरू आहे.
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.