गुन्हेगारी

महिला शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल…

 

● शेतकरी महिला व तिच्या पतीला चार जणांनी केली मारहाण

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी 
नारायणगाव : ऊसाच्या शेतात बेकायदा जेसीबी घेऊन रस्ता तयार करण्याच्या बहाण्याने महिलेसह शेतकऱ्यांना मारहाण करून ऊस पिकाचे नुकसान करणाऱ्या नारायणगावच्या विद्यमान सरपंचासह एकूण चार जणांवर नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार पोलीस नाईक भीमा लोंढे यांनी दिली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ रोजी नारायणगावचे विद्यमान सरपंच व त्यांचे साथीदार हे फिर्यादी शुभांगी अमोल तांबे (रा. तांबेमळा, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्या शेतामध्ये रस्ता बनविण्याच्या बहाण्याने आले. यावेळी फिर्यादीचे पती अमोल तांबे व त्यांच्या घरातील वयस्कर व्यक्तींनी सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितले की, तुम्ही बेकायदा आमच्या शेतात घुसू नका. तुम्हाला जर रस्ता बनवायचा असेल, तर माझ्या हद्दीतून चार फूट व शेजारच्या शेतकऱ्यांच्या शेतातून चार फूट असा सामायिक रस्ता करावा व याबाबत तुमच्याकडे तहसीलदार किंवा न्यायालयाचा आदेश आहे का, असे म्हणून त्यांना बेकायदा रस्ता बनवण्यात मज्जाव केला. यावेळी सरपंच योगेश पाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली व माझ्या बरोबर लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, अशी फिर्याद शुभांगी अमोल तांबे यांनी दिली.

नारायणगाव पोलीस स्थानकात बुधवार, दिनांक १७ मार्च २०२१ रोजी दुपारी तक्रारदार फिर्यादी शुभांगी अमोल तांबे यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार नारायणगावचे विद्यमान सरपंच योगेश नामदेव पाटे, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, आकाश वासुदेव कानसकर, निवृत्‍ती रामचंद्र तांबे (सर्व रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांच्यावर भा.द.वि. कलम ३२३, ४२७, ५०४, ५०६, ३४ यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलिस करीत आहेत.

दरम्यान या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ शूटिंग ( छायाचित्रण ) करण्यात आले असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे.
——

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 27 Oct 2026

सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…

5 hours ago

MahaBulletin — 26 Oct 2026

शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ सह्याद्रीतील…

1 day ago

MahaBulletin — 23 Oct 2026

गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिवेआगर…

4 days ago

MahaBulletin — 22 Oct 2026

बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

1 week ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

1 week ago

This website uses cookies.