शैक्षणिक

शासनाला जाग येणार नसेल, तर आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या : राज्यातील पात्रता धारक ग्रंथपालांची शासनाकडे निवेदनातून मागणी ● महाविद्यालयातील ग्रंथापल पदांच्या भरतीसाठी ग्रंथपाल महासंघाचा बेमुदत उपोषणाचा इशारा ● पुणे शिक्षण संचालक कार्यालयासमोर १२ ऑगष्ट पासून करणार उपोषण

शासनाला जाग येणार नसेल, तर आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या : राज्यातील पात्रता धारक ग्रंथपालांची शासनाकडे निवेदनातून मागणी
● महाविद्यालयातील ग्रंथापल पदांच्या भरतीसाठी ग्रंथपाल महासंघाचा बेमुदत उपोषणाचा इशारा
● पुणे शिक्षण संचालक कार्यालयासमोर १२ ऑगष्ट पासून करणार उपोषण

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क 
पुणे : गेल्या दहा वर्षापासून राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील पदभरती प्रक्रिया ही वेगवेगळ्या कारणाने रेंगाळली आहे. त्यात ग्रंथापाल पदाचाही समावेश आहे. ११ ऑगष्ट पर्यंत जर शासनाने भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी शासन निर्णय काढला नाही; तर १२ ऑगष्ट पासून नांदेड सह राज्यातील दहा उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या वतीने सहसंचालकांना निवेदन देऊन देण्यात आला.

अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथापालांची पदभरती सुरु करावी व ४ मे २०२० रोजी पदभरतीवर निर्बंध लादण्या अगोदर ज्या महाविद्यालयांना शासन नियमानुसार भरतीची परवानगी मिळाली आहे अशा महाविद्यालयांना तेथील पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी. तसेच खासगी विनानुदानित संस्थेमधील ग्रंथापालांची नियुक्ती विद्यापीठ नियमांना अधीन राहून वेतनश्रेणी नुसार करण्यात यावी, या मुख्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण आंदोलन केले जाणार आहे.

ग्रंथालय हे महाविद्यालयाचा आत्मा समजला जातो. महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा उद्देश पूर्ण करण्यात ग्रंथपाल महत्वाची भूमिका बजावत असतो. मात्र महाविद्यालयातील एवढे महत्वाचे पद गेल्या अनेक वर्षापासून चुकीच्या धोरणामुळे रिक्त राहिले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी २७ जून रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्या सोबत पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन आठ दिवसात पदभरतीचा शासन निर्णय काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र एक महिना झाला तरी अद्याप त्यावर कसलीच कारवाई झालेली नाही. परिणामी ग्रंथपाल संघटनेने राज्यातील दहा सहसंचालक कार्यालयासमोर १२ ऑगष्ट पासून बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्याचा निर्धार केला आहे.

ग्रंथपाल महासंघाच्या वतीने १२ ऑगष्ट रोजी पुणे संचालक कार्यालया समोर जोपर्यंत शासन निर्णय निघणार तोपर्यंत बेमुदत साखळी उपोषण संदर्भात उच्च शिक्षण संचालक यांना मंगळवारी (ता.२७) निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रंथपाल महासंघाचे सदर निवेदन पुणे येथील संचालक कार्यालयात देताना महाराष्ट्र ग्रंथपाल महासंघाचे प्रा. आनंद नाईक, प्रा. राजेश अगवने, डॉ. प्रवीण पंडित, प्रा. वैशाली पानसरे, प्रा. समीर मोरे उपस्थित होते.

आम्हाला आत्महत्याची परवानगी द्या :-
जोपर्यंत पात्रताधारक आत्महत्या करणार नाही, तोपर्यंत शासनाला जाग येणार नसेल; तर मुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री व वित्त मंत्री यांनी आम्हाला आत्महत्याची रितसर परवानगी देण्याची मागणी राज्यातील पात्रता धारकांनी सदरील निवेदनात केली आहे.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

1 day ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

1 day ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

2 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

This website uses cookies.