महाबुलेटीन न्यूज
चाकण एमआयडीसी : चाकण एमआयडीसीतील म्हाळुंगे गावच्या हद्दीतील कंपनीत पाण्याचा टँकर पुरवण्याच्या वादातून झालेल्या अतुल भोसले खून प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार ( दि. १४ मे ) रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास म्हाळुंगे ( ता. खेड ) येथील रेणुका हॉटेल समोर हल्लेखोरांनी अतुल तानाजी भोसले ( वय २६, रा. भोसले वस्ती, म्हाळुंगे, ता. खेड, जि. पुणे ) याच्यावर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर हल्लेखोर फरार झाले होते. या घटनेचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शनिवार ( दि. १५ मे ) रोजी त्याने पहाटेच्या सुमारास भोसले मयत झाला.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अक्षय अशोक शिवळे, सोन्या पवार, दीपक पिंजण, वैभव खोंडगे, गौरव मुळे, आकाश उर्फ गणेश धरमाळे, ऋषिकेश उर्फ गोट्या सुनील भालेराव, अभिषेक बुद्धसेन पांडे ( सर्व रा. म्हाळुंगे, ता.खेड, जि.पुणे ) व अनिल शांताराम शिंदे ( रा. आडे ) या नऊ जणांना अटक केली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर, पोलीस उपनिरीक्षक महेश चिट्टपल्ले हे पुढील तपास करीत आहेत.
०००००
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
This website uses cookies.