गुन्हेगारी

महाळुंगे येथून सिलेंडरसह पिकअप गाडी चोरट्यांनी पळवली २ लाख ९५ हजाराचा ऐवज लंपास

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी 

म्हाळुंगे : महाळुंगे इंगळे ( ता.खेड ) गावच्या हद्दीतून १९ सिलिंडर असलेली पिकअप गाडी अज्ञात चोरटयांनी पळवून नेली आहे. याप्रकरणी महाळुंगे  पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ( दि. ११ ) रात्री २ ते सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान महाळुंगे येथील देवा इंटरप्रायजेस समोरून ऑक्सिजनने भरलेले १२ व मोकळे ७ असे एकूण १९ सिलिंडर असलेली पिकअप गाडी ( क्रमांक एम एच ४३ एडी ०३९८ ) असा एकूण २ लाख ९५ हजाराचा ऐवज चोरटयांनी चोरून नेला. याबाबत बाबुराव बिसाजी चौधरी ( वय ५२, रा. द्वारका सिटी, महाळुंगे, बिल्डिंग नं. ३, रूम नं. २, ता.खेड, जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.