गुन्हेगारी

महाळुंगे येथे डोक्यात लोखंडी तवा घालून तरुणाचा खून

महाबुलेटीन न्यूज
महाळुंगे इंगळे :
महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) येथे एकमेकांचे मोबाईल फोडल्याच्या रागातून २३ वर्षीय तरुणाचा फेट्याने गळा आवळून व डोक्यात लोखंडी तवा घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालू मंगल रकेवार ( वय २३, सध्या रा. ऋषिकेश शिवळे यांची खोली, महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे मूळ रा. पथरीया, ता. जि. दमूही, मध्यप्रदेश ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना २८ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास महाळुंगे येथे ऋषिकेश शिवळे यांचे रूममध्ये घडली.

याबाबत कालूचा भाऊ पप्पू मंगल रकेवार ( वय ४०, सध्या रा. ऋषिकेश शिवळे यांची खोली, महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे मूळ रा. पथरीया, ता. जि. दमूही, मध्यप्रदेश ) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आरोपी रामसिंग ( वय ३०, रा. रेयाना, ता. जि. दमूही, मध्यप्रदेश ) याचेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष कसबे हे पुढील तपास करीत आहेत.

MahaBulletinTeam

Recent Posts

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

2 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

2 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

3 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

5 days ago

This website uses cookies.