सौ. मंगलताई देवकर
महाबुलेटीन न्यूज
चाकण एमआयडीसी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश यांच्या आदेशानुसार आयुक्तालयाच्या अंतर्गत असणाऱ्या चाकण एमआयडीसीतील म्हाळुंगे पोलीस चौकी मधील महिला दक्षता समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी महिला पोलीस सुप्रिया गोरख शिंदे, उपाध्यक्षपदी महिला पोलीस सोनम दशरथ खंडागळे यांची, तर खराबवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या व महिला लैंगिक शोषण तक्रार केंद्रीय समितीच्या सदस्या मंगलताई हनुमंत देवकर यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
ही कार्यकारिणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशानुसार व पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदशनाखाली करण्यात आली.
● मंगलताई देवकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात मागील दहा वर्षे दक्षता समितीवर सदस्य म्हणून काम केले असून पाच वर्षे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांची नुकतीच केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयांतर्गत एन डी आर एफ मधील बटालियन 5 मध्ये महिला लैंगिक शोषण तक्रार समितीच्या सदस्यपदी निवड झालेली आहे.
■ महिला दक्षता कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :-
समितीच्या अध्यक्षपदी महिला पोलीस सुप्रिया गोरख शिंदे, तर उपाध्यक्षपदी महिला पोलीस सोनम दशरथ खंडागळे यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्यकारिणीच्या सदस्यपदी मंगलताई हनुमंत देवकर ( खराबवाडी ), सुनंदा रामदास शिंदे ( खराबवाडी ), सीमा दिनेश साठे ( खराबवाडी ), सरिता नंदकुमार वाघमारे ( म्हाळुंगे ), नंदा बाबुराव वाफगावकर ( म्हाळुंगे ), वर्षा संतोष म्हाळुंगकर ( म्हाळुंगे ), हेमलता अनिल भोपे ( म्हाळुंगे ), बेबीताई ज्ञानोबा कड ( कुरुळी ), कमल भरत कड ( कुरुळी ), आरती तुषार पवार ( खालुंब्रे ), सविता रामदास गाडे ( येलवाडी ), रत्ना सुरेश पिंगळे ( वासुली ) यांची निवड करण्यात आली आहे.
००००
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.