विधायक

महाबुलेटीनच्या वृत्ताची ग्रामपंचायतने घेतली दखल : ‘तो’ खड्डा बुजविला

पूर्वी
आता

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी

चाकण : येथील चाकण-तळेगाव रस्त्यावरील खराबवाडी ( ता. खेड ) येथील सारा सिटी कमानी समोरील अपघाताला कारणीभूत ठरणारा मोठा खड्डा अखेर आज ( दि. २१ जुलै ) ग्रामपंचयतने बुजविला.
सातत्याने वाहतूक विस्कळीत करून वाहतूक कोंडी करणाऱ्या या खड्ड्याबद्दल रविवारी ( दि. १९ जुलै ) महाबुलेटीनने आवाज उठविला होता. तसेच मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज खराबी यांनी हा खड्डा बुजविण्याबाबत मागणी केली होती. या वृत्ताची दखल घेऊन खराबवाडी ग्रामपंचयतने हा खड्डा तात्पुरत्या स्वरूपात विटांचे तुकडे टाकून बुजविला आहे. सरपंच अनिताताई जंबुकरग्रामविकास अधिकारी रमेश चौरे यांनी वृत्त प्रसिद्ध होताच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सूचना देऊन खड्डे बुजविण्याच्या सूचना केल्या होत्या. अखेर तो खड्डा बुजल्याने नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे. मात्र अजूनही हा खड्डा पक्क्या स्वरूपात डांबरी किंवा काँक्रीटने बुजविण्याची नागरिकांचीमागणी कायम आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

2 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

2 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

3 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

3 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

3 weeks ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

3 weeks ago

This website uses cookies.