विधायक

महाबुलेटीनच्या वृत्ताची ग्रामपंचायतने घेतली दखल : ‘तो’ खड्डा बुजविला

पूर्वी
आता

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी

चाकण : येथील चाकण-तळेगाव रस्त्यावरील खराबवाडी ( ता. खेड ) येथील सारा सिटी कमानी समोरील अपघाताला कारणीभूत ठरणारा मोठा खड्डा अखेर आज ( दि. २१ जुलै ) ग्रामपंचयतने बुजविला.
सातत्याने वाहतूक विस्कळीत करून वाहतूक कोंडी करणाऱ्या या खड्ड्याबद्दल रविवारी ( दि. १९ जुलै ) महाबुलेटीनने आवाज उठविला होता. तसेच मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज खराबी यांनी हा खड्डा बुजविण्याबाबत मागणी केली होती. या वृत्ताची दखल घेऊन खराबवाडी ग्रामपंचयतने हा खड्डा तात्पुरत्या स्वरूपात विटांचे तुकडे टाकून बुजविला आहे. सरपंच अनिताताई जंबुकर व ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे यांनी वृत्त प्रसिद्ध होताच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सूचना देऊन खड्डे बुजविण्याच्या सूचना केल्या होत्या. अखेर तो खड्डा बुजल्याने नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे. मात्र अजूनही हा खड्डा पक्क्या स्वरूपात डांबरी किंवा काँक्रीटने बुजविण्याची नागरिकांचीमागणी कायम आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

1 day ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

3 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

1 week ago

MahaBulletin — 12 Oct 2026

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेड…

1 week ago

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 weeks ago

This website uses cookies.