कोरोना

महाबुलेटीन कोरोना अपडेट : खेड तालुका अपडेट ( दि. २६ऑक्टोबर २०२० ) दिलासादायक बातमी : आज खेड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटून नव्याने १४ रुग्ण आढळले, आखरवाडीतील महिलेचा मृत्यू

नगरपरिषद हद्दीत ९, तर ग्रामीण भागात ५ रुग्णांची वाढ, चाकण मध्ये आढळले ७ रुग्ण, तर राजगुरूनगर व कुरुळी मध्ये २ रुग्ण, आळंदीत झिरो,

एकूण रुग्णांची संख्या ८६७२,
८२६६ रुग्ण बरे होऊन गेले घरी,

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : ( दि.२६ ऑक्टोबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने १४ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज चाकण शहरात सर्वाधिक ७ रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल राजगुरूनगर शहर व कुरुळीत प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात ५ रुग्ण आढळून आले आहेत. 
दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढत असून तालुक्यात ८२६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
नगरपरिषद क्षेत्रात ९, तर ग्रामीण भागात ५ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २१२ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ८६७२ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ९ ) : राजगुरूनगर – २, चाकण – ७, आळंदी – ०,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ५) :
# २ रुग्ण आढळलेली गावे :-  कुरुळी 
# १ रुग्ण आढळलेली गावे :- निघोजे, वाकी खु., सातकरस्थळ 
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – १४
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ८६७२
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १९४
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – २१२
# आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ४७
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – ७
# आज झालेले मृत्यू – आखरवाडी येथे एका महिलेचा मृत्यू झाला असल्याचे सभापती भगवान पोखरकर यांनी सांगितले. गटविकास अधिकारी अजय जोशी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी नागरिकांना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

6 hours ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 day ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

This website uses cookies.