कोरोना

महाबुलेटीन कोरोना अपडेट : खेड तालुका अपडेट ( दि. १९ ऑक्टोबर २०२० ) आज खेड तालुक्यात आढळले ११६ नवीन रुग्ण,

 

येलवाडी, राजगुरूनगर, म्हाळुंगे व चाकण मध्ये आढळले सर्वाधिक रुग्ण, तीन जणांचा मृत्यू,
नगरपरिषद हद्दीत ३५, तर ग्रामीण भागात ८१ रुग्णांची वाढ,
एकूण रुग्णांची संख्या ८३३१,
७८१९ रुग्ण बरे होऊन गेले घरी

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर, ( दि.१९ ऑक्टोबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ११६ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज येलवाडी, राजगुरूनगर व म्हाळुंगे हॉट स्पॉटवर असून आज या गावांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढत असून तालुक्यात ७८१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
नगरपरिषद क्षेत्रात ३५, तर ग्रामीण भागात ८१ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३२४ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ८३३१ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ३५ ) : राजगुरूनगर – १७, चाकण – ११, आळंदी – ७,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ८१) :
# २८ रुग्ण आढळलेली गावे :- येलवाडी.
# १६ रुग्ण आढळलेली गावे :- महाळुंगे.
# ७ रुग्ण आढळलेली गावे :-  खालूंब्रे
# ४ रुग्ण आढळलेली गावे :-  नाणेकरवाडी, सांगुर्डी, चिंबळी.
# ३ रुग्ण आढळलेली गावे :- वाफगाव.
# २ रुग्ण आढळलेली गावे :- वाकी बु., सांडभोरवाडी.
# १ रुग्ण आढळलेली गावे :- होलेवाडी, शेलपिंपळगाव, आंबोली, दोंदे, गारगोटवाडी, सावरदरी, शिवे, निघोजे, कुरुळी, वाडा, निमगांव.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ११६
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ८३३१
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १८८
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ३२४
# आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ४०
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : येलवाडी – २८,
राजगुरूनगर – १७, महाळुंगे – १६, चाकण – ११
# आज झालेले मृत्यू – वाफगाव येथील ७० वर्षीय पुरुष तर केळगांव व राजगुरूनगर येथील तुकाई भांबुरवाडी येथील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 19 Jun 2026

गुरुवार, १८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

12 hours ago

MahaBulletin — 18 Jun 2026

बुधवार, १७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ मोठे…

2 days ago

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

5 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

6 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

7 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

1 week ago

This website uses cookies.