महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर, ( दि.१७ ऑक्टोबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ४७ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज चाकण हॉट स्पॉटवर असून आज शहरात सर्वाधिक १० रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढत असून तालुक्यात ७७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
नगरपरिषद क्षेत्रात १७, तर ग्रामीण भागात ३० रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २८१ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ८१९१ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २७ ) : राजगुरूनगर – ५, चाकण – १०, आळंदी – २,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ३०) :
# ६ रुग्ण आढळलेली गावे :- खराबवाडी.
# ५ रुग्ण आढळलेली गावे :- मेदनकरवाडी
# ३ रुग्ण आढळलेली गावे :- निघोजे.
# २ रुग्ण आढळलेली गावे :- म्हाळुंगे, नाणेकरवाडी,
शेलपिंपळगांव.
# १ रुग्ण आढळलेली गावे :- कडाचीवाडी, वाकी खु., भांबुरवाडी, कान्हेवाडी, सातकर स्थळ, शिरोली , काळूस , शेलगांव , वाडा , दावडी.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ४७
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ८१९१
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १८५
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – २८१
# आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ६८
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – १०
# आज झालेले मृत्यू – चाकण येथील एक ४३ वर्षीय व मेदनकरवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णांचा दि. ८ व दि. १५ ऑक्टोबर २०२० रोजी कोरोनाने मृत्यू झाला आहे.
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.