कोरोना

महाबुलेटीन कोरोना अपडेट : खेड तालुका अपडेट ( दि. १५ ऑक्टोबर २०२० ) आज खेड तालुक्यात ६० रुग्ण आढळले, म्हाळुंगे व चाकण हॉटस्पॉटवर, आढळले सर्वाधिक रुग्ण, ३५० रुग्ण एक्टिव्ह, राजगुरूनगर मधील एकाचा मृत्यू

 

नगरपरिषद हद्दीत १६, तर ग्रामीण भागात ४४ रुग्णांची वाढ,
७५६५ रुग्ण बरे होऊन गेले घरी, एकूण रुग्णांची संख्या ८०९७,

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर, ( दि.१५ ऑक्टोबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ६० कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज म्हाळुंगे व
चाकण हॉट स्पॉटवर असून आज म्हाळुंगे गावात १३ व चाकण शहरात सर्वाधिक १२ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढत असून तालुक्यात ७५६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात १६, तर ग्रामीण भागात ४४ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३५० असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ८०९७ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १६ ) : राजगुरूनगर – २, चाकण – १२, आळंदी – २,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ४४) :
# १३ रुग्ण आढळलेली गावे :- महाळुंगे                           
# ३ रुग्ण आढळलेली गावे :- निघोजे, टाकळकरवाडी, 
# २ रुग्ण आढळलेली गावे :- मेदनकरवाडी, वासुली, पडळवाडी, राक्षेवाडी, चास. 
# १ रुग्ण आढळलेली गावे :-  कडूस, वडगाव पाटोळे, भांबोली, बिरदवडी, खराबवाडी, कुरुळी, नाणेकरवाडी, सावरदरी, पांगरी, वाकी बु., भोसे, मरकळ, रासे, जऊळके बु., खरपुडी. 
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ६०
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ८०९७
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १८२
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ३५०
# आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ८१
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : म्हाळुंगे इंगळे – १३, चाकण – १२
# आज झालेले मृत्यू – राजगुरूनगर येथील एका ६६ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.