गुन्हेगारी

लोणावळ्यात डाॅक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा; डॉक्टर दाम्पत्याचे हातपाय बांधून 67 लाखांचा ऐवज केला लंपास

लोणावळ्यात डाॅक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा; डॉक्टर दाम्पत्याचे हातपाय बांधून 67 लाखांचा ऐवज केला लंपास
छायाचित्र : लोणावळ्यात डॉ. खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा

महाबुलेटीन न्यूज 
लोणावळा : लोणावळ्यातील प्रधानपार्क येथे डाॅक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर गुरुवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सशस्त्र दरोडा पडला. यामध्ये 50 लाख रुपये रोख व 16 लाख 77 हजार 500 रुपयांचे दागिने असा साधारण 66 लाख 77 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळविला आहे.

गुरुवारी (17 जुन) च्या पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान हा दरोडा पडला. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लायडिंगची खिडकी खोलून सहा जण धारदार शस्त्रांसह घरात घुसले, तर अन्य काही जण घराबाहेर थ‍ांबले होते. डाॅक्टर खंडेलवाल यांच्या बेडरुमचा दरवाजा उघडा असल्याने दरोडेखोर थेट घरात घुसले. त्यांनी डाॅक्टर व त्यांच्या पत्नी यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावत हात पाय बांधत घरातील सर्व रोख रक्कम व सोनं असा ऐवज त्यांच्या समक्ष लुटला. साधारण अर्धा तासाहून अधिक काळ दरोडेखोर घरात होते. यानंतर गच्चीवरून चादर बांधत ते खाली उतरले व फरार झाले.

घटनेची माहिती समजल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पद्माकर घनवट यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली व घटनास्थळाचा पंचनामा केला. 

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

14 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.