इंदापूर

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी इंदापूरकर विनंतीपत्र देणार : नगराध्यक्षा अंकिता शहा

नगरपरिषदेत प्रस्तावाला मान्यता
महाबुलेटीन नेटवर्क / शैलेश काटे
इंदापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा यासाठी इंदापूर नगरपरिषदेतील सर्व सदस्य व तमाम इंदापूरकरांच्या वतीने शासनास विनंतीपत्र देण्यात येईल, असा प्रस्ताव नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी आज ( दि.२८ जुलै ) नगरपरिषदेच्या विशेष ऑनलाईन सभेत मांडला. त्यास सर्व नगरसेवकांनी मान्यता दिली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याबाबत नियोजन करण्यासाठी नगरपरिषदेच्या छ. शिवाजीराजे सभागृहात या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर आयोजित करावयाच्या विविध कार्यक्रमांसंदर्भात या सभेत चर्चा करण्यात आली. कार्यक्रमांना मान्यता देण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा. त्यासाठी इंदापूर नगरपरिषदेचे सर्व सदस्य व इंदापूरकरांच्या वतीने शासनास विनंतीपत्र देण्याचा प्रस्ताव नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी मांडला, त्यास सर्व सदस्यांनी मान्यता दिली.
एक ऑगस्ट रोजी शंभर झाडे लावून या शताब्दी वर्षाची सुरुवात करण्यात येणार आहे. नजीकच्या काळात शहरातील लोकमान्यनगर येथे ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक भरत शहा यांनी दिली. हे ग्रंथालय सुसज्ज असावे. त्याबाबत नगरपरिषदेने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा अशी सूचना महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राजश्री मखरे, स्वीकृत नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी मांडली. लवकरच तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल, असे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी स्पष्ट केले.
या विशेष सभेस उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गटनेते कैलास कदम, विरोधी पक्षनेते पोपट शिंदे व सर्व नगरसेवक उपस्थित होते. सभा अधीक्षक म्हणून गजानन पुंडे यांनी काम पाहिले.
admin

Share
Published by
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.