लातुर जिल्ह्यात हरणांच्या धुमाकुळाने शेतकरी हतबल …

महाबुलेटीन टीमवर्क / ओमप्रकाश तांबोळकर
लातुर – जिल्ह्यात सध्या हरणांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, या उपद्रवामुळे शेतकरी चांगलाच हैराण झाला आहे. शिरूरअनंतपाळ तालुक्यातील येरोळ व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून हरणांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोवळ्या उगवलेल्या सोयाबीन  पिकाची कोवळी पाने घाऊन घुसून नासाडी करीत आहेत. अगोदरच पावसाच्या लहरीपणामुळे शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट आलेले होते.
या सर्व समस्यांचा सामना करीत शेतक-यांनी आपली पिके जोपासली होती. लुसलुशीत आणि कोवळी पिके मात्र हरणांचे कळप फस्त करीत आहेत. परिसरातील येरोळ सह डिगोळ , चामरगा , कारेवाडी , नागेवाडी , धामणगाव , सुमठाणा बोळेगाव बु  व इतर भागांमध्येही गेल्या काही महिन्यांपासून हरणांचा उपद्रव वाढला आहे.
हरणांचा बंदोेबस्त करण्यासाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना नसल्यामुळे आणि हरणांना पकडणे किंवा मारणे हा गुन्हा असल्यामुळे शेतकरी हरणांना हकलण्यासही धजावत नसल्याचे चित्र या परिसरात पहावयास आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.