महाबुलेटीन न्यूज
चाकण : कुरुळी (ता. खेड) येथे सतीआई मातेचा २६४ वा भंडारा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. महोत्सवाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना शिववंदन करून झाली. रणरागिणी समूहाने लाठी-काठी, तलवारबाजी,
दांडपट्टा अशा शिवकालीन युद्ध कला शस्त्रांचे प्रात्यक्षिक, तुळजाभवानी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करून पानिपतवीर सुभानरावराजे व सतीमाता सुलोचनादेवी यांना क्षत्रिय मानवंदना देण्यात आली.
१४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत रणसंग्रामामध्ये खेड तालुक्यातील सुभेदार सुभानरावजी श्रीहरीराव गायकवाड सरकार यांना वीरगती मिळाली. अशा क्षत्रिय वीराच्या पत्नी सुलोचनादेवी यांच्या इच्छेनुसार चैत्र शुद्ध दशमीला कुरुळी गावात सध्याचे सतीआई मंदिराचे जागेत सती विधीने त्यांना अग्नी दिला. अशाप्रकारे त्यांनी स्वयंप्रेरणेने क्षत्रिय अमरत्व प्राप्त केले. अशा वैभवशाली ऐतिहासिक मातेच्या पुण्यतिथी व पुण्यस्मरणार्थ दरवर्षी चैत्र शुद्ध दशमीला दिवसभर विधीवत धार्मिक पूजा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शिवकालीन शस्त्राचे प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येतात. समस्त गायकवाड परिवार व ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अन्नप्रसाद देऊन सतीआई माता भंडारा महोत्सवाची सांगता झाली.
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
This website uses cookies.