विशेष

कुमारी अभिज्ञा पंकज तंतरपाळे निसर्ग कन्या पुरस्काराने सन्मानित

कुमारी अभिज्ञा पंकज तंतरपाळे निसर्ग कन्या पुरस्काराने सन्मानित

महाबुलेटीन न्यूज

देहूरोड : नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेच्या वतीने लहान मुलांमध्ये पर्यावरण विषयक गोडी निर्माण व्हावी याउद्देशाने तसेच पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लहान मुलांना विशेष पुरस्काराने गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्टसंस्थेने ठेवले आहे. याच अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथील कुमारी अभिज्ञा  पंकज तंतरपाळे हीला संस्थेच्या वतीने देशाच्यास्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. दिपक यशवंत भवर यांच्या हस्ते निसर्ग मेडल, प्रमाणपत्र, वृक्षदेऊननिसर्ग कन्यापुरस्काराने गौरविण्यात आले.

सात वर्षांची अभिज्ञा येथील केंद्रीय विद्यालयमध्ये शिकत आहे. आजपर्यंत तीने 200 वृक्ष लागवड केली असून स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमोहत्सवी वर्षानिमित्त 75 वृक्ष लागवड केली आहे. सदर कार्यक्रम विकासनगर किवळे येथील किड्स वर्ल्ड इंटरनॅशनल प्री प्रायमरी स्कूलयेथे पार पडला. या कार्यक्रमास संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. दिपक भवर, राष्ट्रीय सचिव सचिन वाघ, महाराष्ट्र राज्य जनसंपर्क विभागअध्यक्ष दिनेश चीगाटे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सुनीता चीगाटे, देहूरोड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गज्जेवार, कॅन्टोन्मेंट बोर्डचेमाजी नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे, फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, सिंधुताई तंतरपाळे, सामाजिककार्यकर्ते युवा सेनेचे राजेंद्र तरस, राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष अंकुश तरस, युवा सेनेचे श्रोहित माळी, सामाजिक कार्यकर्तेसंतोष म्हस्के, पुनम म्हस्के, किड्स वर्ल्ड शाळेच्या सर्व शिक्षिका, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

2 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

3 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

4 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

5 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

6 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 week ago

This website uses cookies.