महाबुलेटीन न्यूज
चाकण : वाकी बुद्रुक ( ता. खेड ) येथील संगणक अभियंता कु. कृतुजा कैलास पारधी ( वय 27, सध्या रा. भोसरी, पुणे ) यांचे आज बुधवारी ( दि. 28 एप्रिल ) आकस्मिकपणे निधन झाले. मागील चार वर्षांपूर्वी मराठा आरक्षण संदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यलयावर निघालेल्या मराठा मोर्चा आंदोलनात आरक्षण व युवकांचे प्रश्न आपल्या भाषणातून निर्भीडपणे मांडले होते.
कृतुजाच्या मागे वडील डिफेन्स ऑफिसर कैलास पारधी, आई कल्पना पारधी, बहीण पौर्णिमा सागर सोमवंशी, बहीण करिश्मा, भाऊ कल्पेश असा परिवार आहे. मागील 15 दिवस आई-वडिलांची शुश्रूषा करणारी मुलगी आज दुपारी अचानक चालता-बोलता सर्वांना सोडून काळाच्या पडद्याआड गेली. अतिशय हसतमुख, विनम्र व संस्कारक्षम स्वभावाने ती नातेवाईकांमध्ये सर्वांची लाडकी होती. तिच्या जाण्याने चाकण व भोसरी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. वाकी येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कृतुजाला भावपूर्ण श्रद्धांजली…💐💐💐
——-
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.