निवड/नियुक्ती

कृष्णप्रकाश पिंपरीचे नवे पोलिस आयुक्त

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पिंपरी चिंचवड : पोलिस दलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी झाला आहे. पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे. कृष्णप्रकाश यांनी सांगली व नगर जिल्ह्यात असताना चांगलेच गाजविले होते. नगरमध्ये तर त्यांनी गुन्हेगारांना चांगलाचा चाप लावला होता.

दरम्यान बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) आणि मिलिंद भारंबे (गुन्हे) यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. विनयकुमार चौबे यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) येथे नियुक्ती झाली आहे.

पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलिय आयुक्त विवेक फणसळकर यांना आहे तेथेच
ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या दोन प्रमुख शहरांत नवे पोलिस आयुक्त येणार नाहीत.

नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे. मनोजकुमार लोहिया यांच्याकडे कोल्हापूर महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रताप दिघावकर यांची नियुक्ती नाशिक परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणून झाली आहे. नाशिकचे महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे.

नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी बिपीनकुमारसिंह यांची नियुक्ती झाली आहे. अमरावतीच्या आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. एकूण ४५ जणांच्या बदल्यांच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

15 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.