कोयना परिसरात भूकंपाचे धक्के

महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
सातारा : साताऱ्यातील कोयना परिसर भूकंपाच्या धक्याने हादरला आहे. या भूकंपाची तीव्रता 2.6 रिश्टर स्केल इतकी होती. रात्री दीड वाजेच्या सुमारास कोयना परिसरातील पाटण, कोकण किनारपट्टीचा परिसरात भुकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्र बिंदू वारना खोऱ्यातील चांदोली गावच्या पश्चिमेला 6 किमी अंतरावर असल्याचं सांगितलं जात आहे. या भूकंपामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.कोयना धरणाच्या परिसरात नेहमी भूकंपाचे धक्के जाणवत असता. मागील महिन्यात 24 जून रोजी वारणा खोऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.
भूकंपाचे 2.3 रिश्‍टर स्केलचे धक्के जाणवल्याची नोंद झाली. दरम्यान, वारणा खोऱ्यात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोयना धरणाला यापासून कोणताही धक्का नसल्याचंही सांगण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरू नये, असंही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.दरम्यान, दोन दिवसांपूर्वीत दिल्ली आणि परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता. काही सेकंद धक्के जाणवत होते. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उत्तर भारताला भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत.
admin

Recent Posts

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

41 minutes ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

42 minutes ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

This website uses cookies.