गुन्हेगारी

किरकोळ वादातून सुरीने गळा चिरून खून करणारा आरोपी २४ तासात जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

किरकोळ वादातून सुरीने गळा चिरून खून करणारा आरोपी २४ तासात जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

महाबुलेटीन न्यूज । प्रतिनिधी 
राजगुरूनगर : किवळे ( ता. खेड ) येथे काल ( दि. ११ ) किरकोळ वादातून कुरकुंडी येथील तलाठी कार्यालयातील कोतवालाचा सुरीने गळा चिरून खून करून फरार झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासात जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, खेड पोलीस स्टेशन गु.र.नं ५४०/२०२१ भादवि कलम ३०२ नुसार दाखल होता. फिर्यादी नामे चंद्रकांत सुदाम शिवले ( रा. किवळे ता. खेड ) यांनी फिर्याद दिली की, दि.११/०९/२०२१ दुपारी साडेचारच्या सुमारास मी व माझे मित्र नामे रमजान शेख आणि रफिक शेख असे माझ्या मोटारसायकल वरून ट्रिपलसीट पाईट ते शिरोली रोडने जात असताना रमजान शेख व रफिक शेख यांच्यात हॉटेल मध्ये झालेल्या किरकोळ वादातून रफिक शेख याने रमजान शेख याच्या गळ्यावर धारधार हत्याराने वार करून खून केला. अशा आशयाची फिर्याद दिली होती.

सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणून आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आज स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील फरार आरोपी हा वडगाव मावळ फाट्यावर येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन सापळा लावला असता एक संशयित इसम फिरताना आढळला त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव रफिक उस्मान मुलाणी ( वय ३५ वर्ष रा. अहिरे, ता. खेड, जि. पुणे ) असे सांगितले. त्याच्याकडे सदर गुन्ह्याची अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सदर आरोपीची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाही साठी खेड पोस्टेच्या ताब्यात दिला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. लंभाते यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सपोनि. नेताजी गंधारे, पोसई. रामेश्वर धोंडगे, सफो. प्रकाश वाघमारे, पो. हवा. सूर्यकांत वाणी, पो. हवा. विक्रम तापकिर, पो. हवा. दिपक साबळे, पो.ना. योगेश नागरगोजे, पो. ना. संदिप वारे, पो. कॉ. अक्षय नवले, पो. कॉ. निलेश सुपेकर यांनी केली आहे.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

12 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.