महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
आळंदी : कोल्हापूर येथील वारकरी संप्रदायातील अध्वर्यू, सुप्रसिद्ध प्रवचनकार , किर्तनकार, ह.भ.प. भानुदास महाराज यादव (वय ६५ वर्षे) खाजगी इस्पितळात देहावसान झाले. वैंकुठवासी ब्रम्हीभूत गुरुवर्य रामचंद्र महाराज यादव यांचे ते सुपुत्र होत. त्यांच्या पश्चात त्यांनी कोल्हापूर व पंढरपूर मठाचे उत्तराधिकारी म्हणून पारमार्थिक परंपरा जतन केली होती.
गुरुवर्य साखरे महाराज संपादीत सार्थ ज्ञानेश्वरी, विचार सागर, सार्थ अमृतानुभव, सार्थ चांगदेव पासष्टी यासारख्या अनेक ग्रंथांचे त्यांनी पुनः संपादन व प्रकाशन केले होते. आपल्या किर्तन, भजन व प्रवचनातून त्यांनी सातत्याने समाज प्रबोधन केले. कोल्हापूर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे ते प्रमुख होते. करवीर काशी फौंडेशनचे प्रमुख सल्लागार म्हणून गेली २० वर्षे ते सांस्कृतिक-सामाजिक चळवळीत सहभागी होते. वारकरी साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार, ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या हस्ते वारकरी जीवन पुरस्कार व स्वामी अमलानंद भक्त मंडळाचे वतीने स्वामी अमलानंद सेवा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक वारकरी दिंडींचे ते मार्गदर्शक होते.
त्यांच्या मागे पत्नी, भाऊ ह.भ.प.महादेव तथा बंडा महाराज, पुतणे हभप. पुरुषोत्तम यादव व हभप. ज्ञानेश्वर यादव, पुतणी, बहिणी, मेव्हूणे, भाचे असा मोठा सांप्रदायिक परिवार आहे.
०००००
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.