गुन्हेगारी

खुनाची सुपारी देणे बेतले स्वतःच्या जीवावर……… सुनेच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचाच केला खून, खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसीतील घटना

 

● खुनाला विलंब होत असल्याने खुनाच्या सुपारीचे पैसे परत मागितल्यामुळे आरोपींनी केला सुपारी देणाराचाच खून
● ४८ तासाच्या आत आरोपी जेरबंद, २ जणांना अटक, एकजण फरार, मालकाच्या जेसीबी चालकाचा खुनात सहभाग
● आरोपींकडून एक गावठी पिस्तुल व ९ जिवंत काडतुसे जप्त

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क 
चाकण एमआयडीसी : येथील एमआयडीसी फेज टू मधील वराळे गावच्या हद्दीत दि. १ डिसेंबर २०२० रोजी आढळलेल्या पुरुषाच्या मृतदेहावरून अखेर एक थरारक खून प्रकरण उघडकीस आले आहे. आपल्या सुनेच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचाच आरोपींनी खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून आरोपीमध्ये मयत पानमंद यांच्या जेसीबी चालकाचा सहभाग आहे.

विनायक भिकाजी पानमंद ( वय ६०, रा. शिंदेगाव, ता. खेड, जि. पुणे ) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या म्हाळुंगे पोलीस चौकी पोलिसांनी २ आरोपींना पिस्तुलासह व ९ जिवंत काडतुसासह अटक केली. एक आरोपी फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी असलेल्या शिंदेगाव येथील विनायक पानमंद यांचा मुलगा अजित याचा विवाह झाला होता. मात्र, विवाह झालेला असताना अजितने कुटुंबीयांना माहिती न देता दोन वर्षापूर्वी प्रेम विवाह केला होता. याची माहिती वडील विनायक यांना काही महिन्यांपूर्वी कळाली. त्यातून विनायक यांचे मुलगा अजितसोबत भांडण होऊन खटके उडायला लागले. सतत भांडण सुरू झाली. हे सर्व दुसरा विवाह केल्यामुळे होत असल्याचे विनायक यांना वाटू लागले.

मुलाचा पहिला संसार विस्कटल्याचे दुःख त्यांना होत होते. त्यामुळे त्यांनी मुलाच्या दुसऱ्या पत्नीचा खून करण्याचा कट रचला. त्यासाठी त्यांनी त्यांचा जेसीबीचा चालक आरोपी अविनाश बबन राठोड ( रा. मोहखेड, ता. जिंतूर, जि. परभणी ) व त्याचे मित्र मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू ( मूळ रा. हजरत गंज, खानकाह रोड, गल्ली नं. ८, मुंगेर, बिहार ) आणि मोहम्मद वसीम जब्बार ( मूळ रा. बालन बाजार, मुंगेर, बिहार ) यांना आपला मुलगा अजितची दुसरी पत्नी म्हणजेच सून सीमा हिचा खून करण्यासाठी टप्याटप्याने १ लाख ३४ हजारांची सुपारी दिली.

आरोपींनी गोवा आणि उत्तर प्रदेश येथून दोन पिस्तुल आणली आणि खुनाचा कट रचला. परंतु, महिलेचा खून करायचा असल्याने आरोपी घाबरले होते. त्यामुळे उशीर लागत होता. दरम्यान, मयत विनायक (सासरे) हे सुनेचा खून कधी करणार? होत नसेल तर पैसे परत करा, असं म्हणत त्यांनी आरोपीकडे तगादा लावला होता. विनायक हे पैसे परत मागत असल्याने आरोपींनी त्यांना चाकण एमआयडीसी फेज 2 मधील वराळे येथील सुधीर मुंगसे यांच्या नवीन पत्रा शेड जवळ बोलावून त्यांचा गळा दाबून खून केला. यातील छोटू हा फरार झाला आहे.

या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं. १२९८/२०२०, भा द वि कलम ३०२, २०१, १२०(ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सपोनि प्रमोद क्षीरसागर, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस हवालदार राजेंद्र कोणकेरी, राजू जाधव, संपत मुळे, प्रशांत वहिले, अमोल बोराटे, ऋषिकेश भोसुरे, हिरामण सांगडे, शरद खैरे यांनी केली असून पीएसआय ज्ञानेश्वर दळवी हे पुढील तपास करीत आहेत.
——-

दरम्यान एका चोरीच्या उद्देशाने निघालेल्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी एक पिस्तुल जप्त केले आहे. राम बबन लालगुडे ( वय ३२, भांगरे वस्ती, म्हाळुंगे ), लाखविंदर कर्नलसिंग बाजवा ( वय ४३, मूळ रा. ग्वाल्हेर, मध्यप्रदेश ) व विश्वनाथ दामोदर शिंदे ( वय २९, रा. सेक्टर नं. १ बी, रम नं. १७, म्हाळुंगे ) यांना पोलिसांनी पिस्तुलसह अटक केली आहे.
———

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

1 day ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

5 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.