कोरोना

सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र सोडून खेड तालुका ‘अनलॉक’ : आमदार मोहिते यांचे प्रयत्न

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
गुरुवार दि. २३ जुलै रोजी सकाळी तहसिलदार कार्यालय, खेड यांच्याकडून खेड तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण, आळंदी व १८ गावे कंटेनमेंट झोन घोषित करून सदर ठिकाणी लॉक डाऊन घोषित केला होता. परंतु याविषयी समाजातील विविध घटकांकडून आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आमदार मोहिते यांनी सदर विषयासंदर्भात मा. जिल्हाधिकारी पुणे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार उपरोक्त आदेशाच्या अनुषंगाने खेड तालुक्यातील १८ गावे व ३ नगरपालिका क्षेत्रामध्ये प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून कालावधी दिनांक २४/०७/२०२० पर्यंत वाढविण्यात आला होता. त्यानंतर  कोरोनाबधित रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दि. २८/०७/२०२० पर्यंत  निर्बंध  चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु रुग्णसंख्या ही  वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात आढळून येत आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राचा फेरआढावा घेऊन ज्या भागात किंवा परिसरात रुग्णसंख्या जास्त आहे, तो भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येईल आणि तेथे प्रतिबंधित क्षेत्राचे नियम पूर्वीप्रमाणेच  लागू राहतील. तसेच ज्या भागात रुग्णांची संख्या नसेल, असा भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातून वगळणे बाबत आढावा घेऊन फक्त सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राचे आदेश दि. २४ जुलै रोजी स्वतंत्रपणे निर्गमित  करण्यात येतील, असे प्रभारी प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी आमदार मोहिते यांना व्हॉटसअपद्वारे कळविले आहे. त्यामुळे ज्याठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत, असा सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र सोडून बाकी सर्व भागातील व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

7 hours ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

4 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

1 week ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

This website uses cookies.