आरक्षण

खेड तालुक्यातील 162 सरपंच पदाची आरक्षण सोडत मंगळवारी खांडगे लॉन्स मध्ये होणार…पहा सरपंच पदाच्या आरक्षणाची तालुक्यातील आकडेवारी

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : राजगुरूनगर येथील खांडगे लॉन्स मध्ये 8 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता खेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाची सोडत जाहिर केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले व प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील 1400 ग्रामपंचायतींसह खेड तालुक्यातील 162 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची सोडत मंगळवारी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तहसिल पातळीवर ही सोडत जाहिर केली जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील 1400 ग्रामपंचायतीच्या 5 मार्च 2020 ते 4 मार्च 2025 या कालावधीसाठी ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाच्या सोडतींचा कार्यक्रम 27 मार्च 2020 रोजी होणार होता. त्यापुर्वी कोरोना महामारीमुळे देशात व राज्यात तसेच पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्याने ही सोडत पुढे ढकलण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबरच्या पत्राद्वारे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम प्रसिद्ध केल्याने सदर ग्रामपंचायत निवडणूका कधीही जाहिर होऊ शकतात.

याकरिता ग्रामपंचायत सरपंच पदाची सोडत कार्यक्रम मंगळवार दि. 8 डिसेंबर रोजी तहसिलदारांनी शासनाचे कोविड 19 संदर्भातील सुरक्षेचे नियम पाळत आयोजित करावा, असे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी आदेशात म्हंटले आहे.

पुणे जिल्ह्यात 1400 ग्रामपंचायतीं पैकी 114 ग्रामपंचायती ह्या अनुसुचित क्षेत्रातील आहेत. यामध्ये खेड तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

लोकसंख्या निहाय उर्वरित 1286 ग्रामपंचायतींमध्ये अनुसुचित जमातीकरिता 125, अनुसुचित जाती करिता 58, नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी 347 व सर्वसाधारणसाठी 756 सरपंच पदे अशी वर्गवारी करण्यात आली आहे. यापैकी 50 टक्के पदे ही महिलांसाठी राखीव असणार आहेत.

खेड तालुक्यात लोकसंख्या निहाय 162 ग्रामपंचायतींमध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रासाठी अनुसुचित जमातीकरिता 9, अनुसुचित जाती करिता 13, नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी 38 व सर्वसाधारणसाठी 81, तर अनुसूचित क्षेत्रासाठी अनुसूचित जमातीला 21 सरपंच पदे अशी वर्गवारी करण्यात आली आहे. यापैकी 50 टक्के पदे ही महिलांसाठी राखीव असणार आहेत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

18 minutes ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 day ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

3 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

6 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

This website uses cookies.