आरोग्य

खेड तालुक्यात 16 व 17 तारखेला सर्वेक्षण

 

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन होणार सर्वेक्षण,
आरोग्य विभागाला सहकार्य करा : आमदार दिलीप मोहिते पाटील

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खेड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ही संख्या आटोक्यात आणणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीने “माझे कुटुंब- माझी जबाबदारी” ह्या मोहिमे अंतर्गत घरोघरी जाऊन चाचण्या करण्याचे ठरविले आहे.

खेड तालुक्यात राजगुरूनगर, चाकण व आळंदी या शहारांसह जास्त रुग्ण आढळलेल्या गावांत बुधवार दि. 16/9/2020 व गुरुवार दि.17/9/2020 रोजी तालुक्यातील प्रत्येक घरात जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. 

 

“आपण सर्वांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी. आपल्या कुटुंबातील आजारी व्यक्तीविषयीची खरी माहिती आरोग्य कर्मचार्‍यांना द्यावी, जेणे करून ही कोरोना महामारी आटोक्यात आणण्यात आपण यशस्वी होऊ. आपण सर्वांनी शासनास सहकार्य करावे”, असे आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.