आरोग्य

खराबवाडीत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद, शनिवारी २२३ ग्रामस्थांचे लसीकरण, आजपण लसीकरण सुरू…

खराबवाडीत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद, शनिवारी २२८ ग्रामस्थांचे लसीकरण, आजपण लसीकरण सुरू…

महाबुलेटीन न्यूज 
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील ग्रामपंचायत, कोरोना समिती व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी एका दिवसात ४५ वयाच्या पुढील २२३ नागरिकांनी लसीकरण करून घेतले.

खराबवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत लसीकरण सुरू असून जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. जयश्री महाजन, तलाठी श्रीधर आचारी, ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे यांनी केले आहे.

या लसीकरण शिबिरासाठी पोलीस पाटील किरण किर्ते, आरोग्य सेवक मकसूद शेख, मीना ताजने, ग्रामपंचायत कर्मचारी अजित केसवड, विठ्ठल वर्ये, सुनील खराबी, विशाल खोपडे, सारिका जाधव, गणपत कड, शंकर धोत्रे, कल्पना जाधव, सर्व कर्मचारी, आशा वर्कर सेविका मंदा कड, रेखा धाडगे, कविता म्हस्के, रंजना लांडे, आशा जंबुकर, जयश्री काळकुंड, शुभांगी शिंदे, संगणक ऑपरेटर भूषण हटवाल व प्रथमेश कांबळे यांचे सहकार्य लाभले.

शिबीर उदघाटन प्रसंगी माजी सरपंच हनुमंत कड, माजी सरपंच पांडुरंग बिरदवडे, हनुमान दिंडी सोहळ्याचे माजी अध्यक्ष मधुकर कड, माजी ग्रा. पं. सदस्य रामचंद्र खराबी, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ लवंगे, नंदाराम कड, लक्ष्मण खराबी, विलास सावंत, उमाजी कड, उद्योजक प्रमोद टेकाळे, खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी कड, सुरेंद्र खराबी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
————-

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

15 hours ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

3 days ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

4 days ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

5 days ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

7 days ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

1 week ago

This website uses cookies.