प्रशासकीय

कायमस्वरूपी मुख्याधिकारी त्वरित नियुक्त करावेत : गणेश काकडे

 

महाबुलेटीन न्यूज
तळेगाव दाभाडे : येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक त्वरीत करण्याची मागणी तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक गणेश काकडे यांनी केली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी श्री. झिंझाड साहेब यांची बदली होऊन सुमारे तीन महिने होऊन सुद्धा रिक्त पदावर नवीन कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक झाली नसल्याने सर्वच प्रशासकीय कामांना खीळ बसली असल्याचे काकडे यांनी नमूद केले आहे. 

कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने धोरणात्मक निर्णय घेण्यास मर्यादा येत आहेत. मुख्याधिकारी यांना नगर परिषदेच्या प्रशासकीय व कार्यात्मक कारभारा बाबतचे अधिकार नगरपरिषदा, नगरपंचयती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 व त्याला अनुलक्षून नगर परिषदेच्या कारभारासाठी मा. जिल्हा अधिकारी यांचे मंजुरीने तयार केलेले ४१ उपविधी व तसेच शासनाचे अधिनियम जसे महाराष्ट्र प्रदेश नगर रचना अधिनियम १९६६, जन्म-मृत्य अधिनियम, वृक्ष अधिनियम या नुसार विविध अधिकार प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने येणारी कर्तव्ये व जबाबदारी मुख्याधिकारी यांना पार पाडावी लागतात.

मुख्याधिकारी यांनी अध्यक्ष यांचे नियंत्रण, निर्देश यांच्या अधीन राहून नगरपरिषदेच्या वित्तीय व कार्यात्मक प्रशासनावर नियंत्रण ठेवायचे आहे. नगर परिषदेच्या सर्व ठरावाची अंमलबजावणी करणे, नगरपरिषदेचे लेखे व अभिलेखे योग्य नमुन्यात ठेवणे, नगर परिषद लेखा परिक्षकांकडून लेख्या संबंधी अधिनियमितता दर्शवण्यास आल्यास ती दूर करणे, नगरपरिषदेच्या सर्व विभागांवर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आदी जबाबदरी पार पडायची असते. 

मागील आठवड्यात मुख्यधिकारी नसल्याने अग्निशमन बंबात डिझेल नसल्याची घटना घडली होती, तसेच पाणी पट्टी बिला बाबतचा निर्णय मुख्याधिकारी नसल्याने प्रलंबित राहिला आहे. मुख्याधिकारी नेमणूक त्वरित करावी, त्यात कोणीही राजकारण करू नये, असे गणेश काकडे यांनी या वेळी नमूद केले. स्वच्छ सर्वेक्षण या शासनाच्या उपक्रमात तळेगाव नगर परिषदेला अव्वल स्थानी नेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी हातभार लावण्याचे आवाहन काकडे यांनी केले आहे.
—-

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.